Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली व निवडणुकीदरम्यान योजना गेम चेंजर ठरली.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमा दरमहा 1500 रुपये हप्ता जमा करण्यात येत आहे.
तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत पात्रता, अपात्रता व अर्जाची प्रक्रिया काय आहे याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज पात्रता
लाडकी बहीण योजना तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील पात्रता निकषाच्या आधारे या योजनेत अर्ज करता येणार आहे, तर बघूया काय आहे लाडकी बहीण योजनेत पात्रता.
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहित, विधवा घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित महिलांना या योजनेत अर्ज करता येणार आहे.
- या योजनेत वयाची किमान मर्यादा 21 वर्षांपूर्वी 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत लाभ घेता येईल.
- लाभार्थी महिलांच्या स्वतःच्या आधार कार्ड बँक DBT Link असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
लाडकी बहीण योजनेचे अपात्रता

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत अर्ज केला असेल व खाली निकषाच्या बाहेर जाऊन या लाभ घेतला असेल तर तुमच्या अर्ज अपात्र करण्यात येईल, तर बघूया लाडकी बहीण योजनेचे अपात्र निकष काय आहे.
- ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहेत त्यांना या योजनेत अर्ज करता येणार नाही.
- ज्या कुटुंबात सदस्य आयकर दाता आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ मंडळ/ उपक्रम किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार.
- लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबवत येणाऱ्या इतर योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या लाभ घेत असेल.
- या कुटुंबातील सदस्य विद्यामान किंवा माजी आमदार, खासदार आहे.
- या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कार्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ संचालक आहेत.
- जा कुटुंबाकडे चारचाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून) त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने नोंदनी कृत आहेत.
लाडकी बहीण योजनेत अर्ज प्रक्रिया काय आहे
- जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.
- तुम्ही अधिकृत नारी शक्ती दूत ऐप माध्यमातून पण अर्ज करू शकता.
- ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिक/ सेतू सुविधा केंद्र/ ग्रामसेवक/ आशा सेविका/ वार्ड अधिकारी/आपले सरकार सेवा केंद्रांकडे ऑनलाईन आफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- योजनेत अर्ज करताना अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता, याबाबतचे सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक करण्यात यावी, बँकेचे मोबाईल नंबर अचूक टाकावा.
Im a passionate blogger with a degree in Mass Communication and years of experience in writing and digital publishing. I enjoy simplifying complex topics like government schemes, daily updates, and social awareness stories for my readers.