Majhi Ladki Bahin Yojana Online Arj 2025
Majhi Ladki Bahin Yojana Online Arj 2025 : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वकांशी योजना लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सशक्तिकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना आहे.
ही योजना सुरू करताना राज्य शासनाने महिलांना या योजनेत प्रमुख केंद्रबिंदू ठेवून महिलांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.
जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात राज्य शासनाने केली आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व निराधार महिलांना आर्थिक दृष्ट्या सबलीकरण व स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक मनाला 1500 रुपये मानधन दिले जाते.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
या योजनेमध्ये राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे अडीच कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हप्ता दिले जाते.
या योजनेमध्ये लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाने अधिकृत पोर्टल व नारीशक्ती दूत ऐप लॉन्च केलेला आहे, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही या योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचून या योजनेत कोणती कागदपत्रे लागतात त्यांची सर्व पडताळणी करून या योजनेत सहभागी होऊ शकता. तसेच नारीशक्ती दूत ऐप यांच्या माध्यमातून पण या योजनेत तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ होऊ शकता, तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत अर्ज कसा भरायचा त्याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

लाडकी बहीण योजनेत अर्ज कसा भरावा | लाडकी बहीण योजना फॉर्म online apply
राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लॉन्च केलेली आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही सर्व माहिती तिथे अचूकपणे सर्व कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला या पोर्टलवर अर्ज करायचा असेल सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायची आहे.
- लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहेत, लाडकी बहीण योजनेत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तिथे नवीन अकाउंट उघडायचे आहे.
- नवीन अकाउंट काढण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर तिथे टाकायचे आहे, त्यानंतर ओटीपी येऊन तो व्हेरिफाय काय करायचा आहे.
- मोबाईल नंबर ने लॉगिन केल्यानंतर आपले नाव आधार कार्ड प्रमाणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे. आपली सर्व माहिती पत्ता, जिल्हा, तालुका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका ही सर्व माहिती अचूकपणे भरायची आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा अर्ज आधार कार्ड टाकून ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे.
- त्यानंतर आपल्याला सर्व डिटेल आधार कार्ड मध्ये असल्याप्रमाणे तिथे आपोआप घेतलेले दिसेल. आपल्याला यानंतर आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे, महिलाचे लग्न पूर्वीचे नाव, संपूर्ण पत्ता, वैवाहिक स्थिती, बँकेचे तपशील व आवश्यक असे सर्व माहिती तिथे अचूकपणे आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे.
- यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे संपूर्ण नाव, बँक खात्याचे नाव, IFSC CODE ही सर्व माहिती अचूकपणे भरायची आहे.
- यानंतर तुम्हाला तिथे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याच्या दाखला किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करायचे आहे.
- तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असेल तर होय नसेल तर नाही इथे टिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र स्वतः स्वाक्षरी करून तिथे अपलोड करायचे आहेत, तसेच अर्जदाराच्या फोटो पण तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहे.
- हमी पत्राचा अस्वीकरण स्वीकार समोर बॉक्स असलेल्या ठिकाणी ✔️ करून हा अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्जामध्ये सर्व माहिती अचूकपणे भरल्यानंतर तुम्हाला सबमिट केलेले अर्ज करून तुम्ही भरलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही तिथे आपल्या स्टेटस पण बघू शकता तुम्ही या वेबसाईट द्वारे किती पण अर्ज करू शकता.
Im a passionate blogger with a degree in Mass Communication and years of experience in writing and digital publishing. I enjoy simplifying complex topics like government schemes, daily updates, and social awareness stories for my readers.