Ladki Bahin Yojana 15th installment Date Maharashtra
Ladki Bahin Yojana 15 Hafta: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र व सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने सुरू केली आहे, या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मासिक हप्ता लाभार्थी पात्र महिलांना मिळत आहे.
सप्टेंबर महिन्याच्या १५वा हप्ता कधी मिळणार याबद्दल पात्र महिलांच्या मनात शंका होती, याबद्दल महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सप्टेंबर महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल एक मोठी अपडेट दिली तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
या दिवशी मिळणार सप्टेंबर महिन्याच्या हप्ता | Ladki Bahin Yojana september Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी पात्र महिलांना प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये महिना मिळतो.
सप्टेंबर महिना संपला असला तरी सप्टेंबर महिन्याच्या १५वा हफ्ता आतापर्यंत लाभार्थी महिलांना मिळाला नाही याबद्दल महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की येत्या दोन दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्ता मिळण्यास सुरू होणार आहे.
त्यामुळे कोणालाही महिलांना घाबरण्याचे कारण नाही आणि 15 तारखेपासून सगळ्या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्ता मिळणार आहे.
या महिलांना 3000 रुपये हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana 15 Hafta Update
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांना आगस्ट महिन्याच्या हप्ता काही तांत्रिक बाबीमुळे किंवा बँकेच्या सर्वर डाउन असल्या मुळे मिळाला नाही अशा महिलांना या महिन्यात 3000 रुपये हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत eKYC न केल्यास हफ्ता बंद | Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिला व बालविकास विभागाच्या वतीने सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेले आहे.
या योजनेमध्ये हफ्ता सुरळीत मिळावा व योग्य महिलांना या योजनेमध्ये फायदा मिळावा यासाठी शासनाने सर्व पात्रला प्रति महिलांची ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे.
त्यामुळे या योजनेत ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन योजनेमध्ये लाभ घेतलेला अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
तसेच सर्व महिलांना येत्या दोन महिन्यांमध्ये केवायसी करायची आहे, तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या हप्ता बंद होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Im a passionate blogger with a degree in Mass Communication and years of experience in writing and digital publishing. I enjoy simplifying complex topics like government schemes, daily updates, and social awareness stories for my readers.