Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना लाडकींणा मिळणार पिंक ई रिक्षा

Ladki Bahin Yojana Pink e Rikshaw Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये चा हप्ता मिळत असतो. पात्र महिलेचे वय हे 30 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषांमध्ये जी महिला बसते त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य मध्ये गरीब आणि गरजू महिलांसाठी या योजनेची सुरुवात केली होती या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बळकट होणे. या योजनेप्रमाणेच महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी रिक्षा योजना पण सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये पात्र लाभार्थी महिलेला रिक्षा मिळत असतो याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Pink e Rikshaw Yojana

WhatsApp Image 2025 11 09 at 1.30.37 PM

महिलाना अजुन एक योजनेचे गिफ्ट

राज्य शासनाने प्रत्येक नागरिकांसाठी राज्यात काही ना काही योजना राबवलेल्या आहेत त्यामध्येमागील काही काळामध्ये महिलांसाठी खूप सार्‍या योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये वयोश्री योजना बेरोजगार भावांसाठी लाडका भाऊ योजना महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच आता महिला व बाल विकास विभागातर्फे राज्यातील कर्ज दहा हजार महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येत आहेत. पिंक ई रिक्षा योजना ही महिला व बाल विकास मंत्री अजित तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आलेली आहे.

WhatsApp Image 2025 11 09 at 1.30.37 PM 1

कोणत्या जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहर, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यानगर, मुंबई असे मोठे जिल्हे यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे बाकी जिल्ह्यामध्ये पण कालांतराने महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रिक्षा ही योजना पुढे पण राबवणे जाणार आहे. पिंक ई रिक्षा ची सुरुवात सर्वप्रथम नागपूर जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

WhatsApp Image 2025 11 09 at 1.30.37 PM 1 1

पिंक ई रिक्षासाठी लाभार्थी महिलेला दहा टक्के रक्कम द्यायचे आहे

पिंक ई रिक्षा लाभार्थी महिलेला मिळवण्यासाठी राज्य सरकार पिंक इ रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20% अनुदान राज्य सरकार देणार असून त्यामध्ये 10 टक्के रक्कम ही लाभार्थी मिळालेला द्यायची आहे आणि उर्वरित 70 टक्के रक्कम सवलतीच्या दरामध्ये कर्ज म्हणून लाभार्थी महिलेला दिली जाणार आहे.
लाभार्थी महिलेला या योजनेचा महिला सशक्तीकरणासाठी लाभ झालेला आहे तसेच पिंक रिक्षा योजनेमार्फत पात्र महिलेला रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे कौशल्य त्यामुळे आले आहे. आणि लाभार्थी महिलेला पिंक ई रिक्षा माध्यमातून सुरक्षित वाहतूक साधन मिळेल तसेच रात्री महिलांना पिंक रिक्षा माध्यमातून सुरक्षित येऊ शकते असा उद्देशीय योजनेचा आहे. ही रिक्षासाठी सर्वप्रथम नागपूर मधून 11000 अर्ज आले होते त्यामध्ये 2000 महिलांना या योजनेमध्ये पात्र ठरवून त्यांना या योजनेचा लाभ दिला आहे आणि त्यांच्या स्वाधीन पिंक ई रिक्षा पण केल्या आहेत.

Leave a Comment