Ladki Bahin Yojana EKYC Update
Ladki Bahin Yojana EKYC Update: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत शासनाने योजना सुरू करताना पात्रते बाबतचे नियम वेळोवेळी स्पष्ट केले आहेत.
त्यामुळे या योजनेत नियमानुसार सर्व पात्र लाभार्थी महिलांना निकषाच्या आधारे या योजनेत अर्ज करून योजनेच्या लाभ घ्यायचा आहे, सध्याच्या माहितीनुसार या योजनेच्या पात्रताच्या निकषांमध्ये मोठे बदल झालेले नाहीत.
परंतु ई केवायसी बाबत नवीन महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आलेल्या तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत ई केवायसी बद्दल नवीन नियम काय झाले याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र आहात की नाही हे कसे तपासावे | Ladki Bahin Yojana New Patrata

| Eligibility Criteria (पात्रता निकष) | Details (तपशील) |
|---|---|
| वयोमर्यादा (Age Limit) | अर्जदार महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे. |
| रहिवासी (Residence) | अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. |
| कौटुंबिक उत्पन्न (Family Income) | अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाख (अडीच लाख) पेक्षा कमी असावे. |
| बँक खाते (Bank Account) | आधार लिंक आणि DBT (Direct Benefit Transfer) सक्रिय असलेले स्वतःचे बँक खाते असावे. |
| सामाजिक स्थिती (Social Status) | विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता (सोडलेली) किंवा निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र आहेत. |
तुम्ही खालील निकष पूर्ण करत असाल, तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहेत!
eKYC बद्दल शासनाच्या महत्त्वपूर्ण नवीन नियम | Ladki Bahin Yojana New Update today in Marathi
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जर तुम्हाला या योजनेचा १५०० रुपये मासिक हप्ता लाभ सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
या योजनेच्या नियमांमध्ये पात्रता मध्ये काही बदल झालेले नाही परंतु लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
या योजनेत लाभार्थी महिलांना योग्य सुरळीत लाभ मिळावा व ज्या महिलांनी निकषाच्या आधारे अर्ज केला त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे.
- eKYC बंधनकारक: या योजनेत लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
- eKYC मुदत: राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सर्व 21 ते 65 वयातील पात्र लाभार्थी महिलांना दोन महिन्याच्या कालावधीत ई केवायसी साठी दिला आहे.ज्यामध्ये इ केवायसी पूर्ण न केल्यास तुमच्या पुढील मासिक हप्ता बंद केला जाऊ शकतो.
- आधार कार्ड व्हेरिफिकेशन: या योजनेमध्ये ई केवायसी करताना विवाहित महिलांसाठी पतीच्या आधार कार्ड आणि अविवाहित महिलांसाठी वडिलांचे आधार कार्ड क्रमांक वापरून कुटुंबाचे आधार कार्ड पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- 1500 हफ्ता: वरील सर्व पात्रताचे निकष तुम्ही पूर्ण करत असाल तर तुमचा अर्ज आधीच मंजूर झाला असेल तर तुम्हाला १५०० रुपये मासिक मानधन मिळत राहण्यासाठी ठेवायचे त्वरित eKYC पूर्ण करा.
1500 हफ्ता बंद अपात्र ठरू शकता | Ladki Bahin Patrata Yadi
तुमच्या कुटुंबातील परिस्थिती खालीलप्रमाणे असल्यास, तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता:
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.