Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची E KYC प्रक्रिया पूर्ण करा फक्त दोन मिनिटांमध्ये पहा सविस्तर

Ladki Bahin Yojana E KYC Process Complete in 2 minute :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेमध्ये पात्र महिलेला दर महिना 1500 रुपयांच्या लाभ मिळत असतो.
पात्र महिला ही लाडकी बहीण योजनेच्या पूर्ण निकषांमध्ये बसणे आवश्यक आहे पण त्या महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. 18 सप्टेंबर 2025 रोजी सुरू केलेली ई केवायसी प्रक्रिया आता 18 नोव्हेंबर पर्यंत तिची आखरी तारीख आहे त्यामुळे अशी प्रक्रिया आता लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. आता आपण यामध्ये पाहूया की दोन मिनिटांमध्ये अशी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबद्दलची संपूर्ण माहिती.Ladki Bahin Yojana E KYC Process Complete in 2 minute

WhatsApp Image 2025 11 09 at 12.51.46 PM

लाडकी बहीण योजनेमध्ये E KYC प्रक्रिया कशी करायची

1.सर्वप्रथम आपला आधार आणि लॉगिन करायचे आहे
2.सर्वप्रथम लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. म्हणजेच ladkibahinmaharastra.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे.
3.आता तुम्हाला तिथे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
4.आता तुम्हाला आपला आधार क्रमांक आणि कप्च टाकून मी सहमत आहे या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे आणि ओटीपी बटन वरती क्लिक करा.
5.आता तुम्हाला आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो इथे टाकून सबमिट बटन वरती क्लिक करा.
6.जर महिला विवाहित असेल तर पतीचा आधार घेऊन आणि महिला अविवाहित असेल तर वडिलांच् आधार क्रुमांक टाकायचा आहे.
7.पुन्हा मी सहमत आहे अशा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून ओटीपी सेंड करायचा आहे.
आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ओटीपी आला असेल तो otp टाकून सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.

aditi mikkk

घोषणापत्र E KYC Ladki Bahin Yojana

E KYC प्रक्रिया पूर्ण करताना घोषणापत्र जोडायचे आहे म्हणजेच तिथे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करायचे आहे ते खालील प्रमाणे बघा.
1.सर्वप्रथम माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कार्यरत नाही. असे दिसेल तिथे होय ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
2.माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. असे दिसेल तिथे होय या पर्यायावरची क्लिक करायचे आहे.

आता सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती केवायसी सक्सेस फुल असा मेसेज दिसेल याचाच अर्थ असा की तुमची प्रक्रिया पूर्णपणे पार पडली आहे किंवा झाली आहे. E KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे आणि एक अशी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर पुढील हप्ते थांबू शकतात.

Leave a Comment