Ladki Bahin Yojana Arj Edit: फॉर्ममध्ये चूक झाली? काळजी नको! अर्ज अपडेट करण्याची संपूर्ण आणि सोपी पद्धत

Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

Ladki Bahin Yojana Edit: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली व निवडणुकीदरम्यान योजना गेम चेंजर ठरली.
लाडकी बहीण योजनेत आमच्या करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबवली आहे या प्रक्रियेमुळे अर्ज करताना काही महत्त्वाचे माहिती ( नाव, जन्मतारीख, बँक तपशील) चुकल्यास तुमच्या हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा अर्ज रद्द होऊ शकते.
त्यामुळे चुकीची माहिती त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे, यासाठी आपल्याला कोणत्या प्रक्रियेच्या पालन करायचे आहे त्या जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेत अर्जात कोणती माहिती दुरुस्त केली जाऊ शकते | Ladki Bahin Yojana Edit

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने करता अर्ज करताना अर्जदारास खालील माहिती दुरुस्त करण्यास किंवा अपडेट करण्याची संधी मिळते.

  • बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड
  • आधार कार्ड नंबर
  • जन्मतारीख
  • विवाह स्थिती

लाडकी बहीण योजनेत अर्ज दुरुस्त करण्याची प्रक्रिया Ladki Bahin Yojana Form Edit Process

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज माहिती दुरुस्त किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अधिकृत पोर्टलवर किंवा नारी शक्ती दूत ऐप ही सुविधा उपलब्ध नसते, कारण की ही माहिती संवेदनशील असते व, हि माहिती दुरुस्त करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.Mazi Ladki Bahin Yojana Payment

स्टेप 1- चुकीची माहिती भरली असेल तर स्त्रोत तपासा:

लाडकी बहीण योजनेत अर्ज करताना तुम्ही चुकीची माहिती भरली असेल तर ते निश्चित करा. उदाहरण तुमचे अर्जातील नाव आणि आधार कार्ड नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नकारला जाईल.

स्टेप 2- स्थानिक केंद्राला भेट द्या

तुम्ही जर अर्ज करताना काही माहिती चुकली असेल तर तुम्ही तुमच्या स्थानिक केंद्र जसे अंगणवाडी/ सेविका ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी किंवा सीएससी सेंटरला भेट देऊन अर्ज दुरुस्त करू शकता.

स्टेप 3- अर्ज दुरुस्ती करा
तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज केला असेल त्या केंद्रावर जाऊन त्या अधिकाऱ्याकडे किंवा अंगणवाडी सेविकाकडे अर्ज दुरुस्ती विनंती अर्ज द्या.

स्टेप 4- आवश्यक कागदपत्र जोडा
अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, उदाहरण आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, विवाह प्रमाणपत्र. इत्यादी.

अर्ज दुरुस्ती करताना या गोष्टी लक्षात ठेवा ladki bahin yojana approval status

  • eKYC करा – लाडकी बहीण योजनेत अर्ज दुरुस्त करताना तुम्हाला अर्जातील नाव व जन्मतारीख दुरुस्त केल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
  • बँक खाते डिबीटी लिंक – अर्ज करताना जो बँक खाते दिलेले आहे ते आधार लिंक व डीबीटी सक्रिय असणे गरजेचे आहे.
  • वेळेची मर्यादा – अर्ज दुरुस्त करण्यासाठी शासनाने काही कालावधी निश्चित केला असल्यास, त्या कालावधीतच तुम्हाला अर्ज दुरुस्त करायचे आहे नाहीतर तुमच्या हफ्ता कायमच्या बंद केला जाऊ शकतो.

Leave a Comment