लाडकी बहीण योजनेत ‘या’ कारणामुळे पैसे मिळत नाहीत! बँक लिंकिंग स्टेटस त्वरित तपासा Aadhar Bank Linking Status check online

Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online

Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनातर्फे सर्व पात्र लाभार्थी 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या आधार कार्ड डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
काही लाभार्थी महिलांना आधार कार्ड डीबीटी लिंक Aadhar DBT Link नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या हप्ता येण्यास विलंब होते किंवा मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे यासाठी त्यांना कोणत्या प्रक्रियेच्या अवलंब करणाच्या जाणून घेऊया या पोस्टमध्ये सविस्तरपणे.

Aadhar Bank Linking Status check online

आधार लिंक असलेले बँक खाते | Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking

लाडकी बहीण योजनेत हफ्ता मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बँक सोबत लिंक असणे अतिशय आवश्यक आहे, तुमचे बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला डीबीटी द्वारे पेमेंट होऊ शकत नाही.

डीबीटी सक्रिय नसणे | Ladki Bahin Yojana Aadhar Bank DBT Linking

लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपये मासिक हप्ता लाभ घेण्यासाठी केवळ तुमच्या आधार कार्ड बँकेचे सोबत लिंक असणे पुरेसे नाही. तुमच्या बँक खात्यात डीबीटी सुविधा सक्रिय असणे गरजेचे आहे.
अनेकदा आधार कार्ड लिंक असूनही डीबीटी चालू नसल्यामुळे हप्ता नकारला जातो.

एकापेक्षा जास्त बँक खातें

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील, सर्व खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल तर शासनाकडून आलेले पैसे NPCI एनपीसीआय च्या मॅपनुसार कोणत्याही एका खात्यात जमा होतात त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्वात महत्त्वाचे खाते डीबीटीसाठी DBT Link सक्रिय करणे गरजेचे आहे.

लाडकी बहीण योजनेच्या बैंकच्या हप्ता विलंब टाळण्यासाठी 3 सोपे उपाय

लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमित जमा व्हावा यासाठी खालील तीन पावले त्वरित उचला:

Step १: आधार बँक खात्याला लिंक करा (Aadhaar Seeding)

तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत (Branch) जाऊन आधार लिंक करण्याचा अर्ज (Aadhaar Seeding Form) भरा आणि तो जमा करा. काही बँका नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे ही सुविधा देतात.

Step २: DBT सुविधा सक्रिय करा (DBT Enablement)

बँकेत अर्ज देताना स्पष्टपणे नमूद करा की, तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे मिळवण्यासाठी तुमच्या खात्यात डीबीटी (DBT) सुविधा सक्रिय करायची आहे. याला अनेकदा “आधार-आधारित पेमेंट सक्षम करणे” असेही म्हणतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तुमचे पेमेंट स्वीकारले जाणार नाही.

Step ३: NPCI मॅपिंग स्थिती तपासा (Check NPCI Status)

तुमच्या नावावर कोणते बँक खाते NPCI पोर्टलवर सध्या DBT साठी सक्रिय आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

  • UIDAI (आधार) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ‘My Aadhaar’ टॅबमध्ये जा.
  • Aadhaar/Bank Linking Status’ तपासा.

या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कोणत्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे आणि ते DBT साठी वैध आहे की नाही, याची माहिती मिळेल. जर स्थिती ‘Active’ नसेल, तर त्वरित बँकेशी संपर्क साधा.

Leave a Comment