Ladki Bahin Yojana 3000 rupaye installment update news :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली क्रांतिकारी योजना आहे या योजनेत मध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयाची रक्कम मिळत असते.
मुख्य लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट म्हणून आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता मकर संक्रांतीच्या सणा निमित्त जमा होण्याची दाट शक्यता आहे. लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी लवकरच मंत्री अदिती तटकरे अधिकृतपणे घोषणा करतील आपण जाणून घेऊया याबद्दलची पूर्ण माहिती आणि कोणत्या दिवशी हप्ता जमा होणार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तर याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana 3000 rupaye installment update news

पुढील हप्ता मिळवण्यासाठी काय करावे
1.सर्वप्रथम लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे की नाही म्हणजेच आपले आधार सिडिंग आहे का नाही हे तपासून पाहायचे आहे जर तुमच्या आधार सिडिंग आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होतील.
2.लाभार्थी महिलेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली का नाही एकदा जेवायसी प्रक्रियेची स्थिती तपासून पाहायची आहे जर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळेल.
3.तुमचे बँक खाते हे अर्ज करताना जे बँक खाते दिले होते तेच आहे का एकदा तपासून पहावे आणि बँक खात्याशी आधार लिंक करावे.

पात्र महिलांना मिळणार तीन हजार रुपये
लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांच्या सन्मानाची योजना बनली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना संक्रातीच्या सणापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार आहेत.
जर लाडक्या बहिणींना संक्रातीच्या सणापूर्वी 3000 रुपयाचा लाभ हा त्यांचे सण उत्सवासाठी आणि घरगुती खर्चासाठी मोठा आधार लागणार आहे मात्र अद्यापही खूप महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे नाही तर त्या महिलांना पुढील लाभापासून वंचित राहू शकतात. पुढील महिन्याच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या 10 तारखेपूर्वी पात्र महिलांच्या बँकेत दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

केवायसी शेवटची तारीख
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 1कोटी 60 लाखांच्या वर महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु अजूनही सुमारे 50 ते 70 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना लाभ मिळत असला तरी प्रशासकीय पातळीवर खूप अडचण जात आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने केवायसी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे जर व्यवस्थित प्रक्रिया पूर्ण झाली तर डीबीटी च्या माध्यमातून पारदर्शकता पणाने महिलांच्या बँका त्या सुरळीतपणे पुढील हप्ते जमा होतील. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या महिलांना अजून 5 दिवस शिल्लक आहेत या पाच दिवसात म्हणजेच 31 डिसेंबर पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तरच पुढील लाभ मिळेल.
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.