Ladki Bahin Yojana Payment Status Check
ladki bahin yojana payment status check :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केल्यास आपल्याला प्रत्येक महिन्यात 1500 रुपये मानधन शासनातर्फे दिले जाते.
अर्ज करताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारे लाभार्थींना या योजनेत अर्ज करायचा आहे ज्या लाभार्थी महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज केला असेल, तर त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत मिळणाऱ्या 1500 रुपये मासिक लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि पेमेंट स्टेटस तपासण्याची पद्धत काय आहे याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये हप्ता कसा मिळवावा | Ladki Bahin Yojana Payment Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करताना तुम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या निकष च्या आधारे अर्ज करायचा आहे.
या योजनेत वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तुम्ही जर अर्ज भरताना यांनी नियमांच्या बाहेर जाऊन अर्ज केला असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणारे 1500 रुपये हप्ता बंद करण्यात येणार आहे.
तसेच तुमचे बँक खाते आधार कार्ड जोडलेले आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी साठी सक्रिय असणे आवश्यक आहे.
अर्ज करताना आधार कार्ड ई केवायसी लिंक करणे अनिवार्य आहे, आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर जोडणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेचा हफ्ता स्टेटस असा तपासा Ladki Bahin Yojana Hafta Status

योजनेचा लाभ तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील पद्धती वापरा:
- अ. अधिकृत पोर्टलद्वारे स्थिती तपासणे
- १. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Portal) जा.
- २. होमपेजवर “अर्ज/लाभार्थी स्थिती तपासा” किंवा “पेमेंट स्टेटस” अशा पर्यायावर क्लिक करा.
- ३. विचारलेले तपशील (उदा. आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक/नोंदणी क्रमांक) भरा.
- ४. कॅप्चा कोड भरून ‘सबमिट’ करा.
- ५. तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि नुकत्याच झालेल्या पेमेंट ट्रान्सफरचा तपशील (उदा. कोणत्या महिन्यात रक्कम जमा झाली) दिसेल.
बँक खात्याद्वारे पेमेंट स्टेटस कसे तपासावे
लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हप्ता आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतं असल्याने बँक खाते तपासणी हा सर्वात सोपा मार्ग आहे त्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचे अवलंब करायचा आहे.
- SMS Alert – जर तुमच्या बँक खात्यात एसएमएस अलर्ट सेवा चालू असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणारे रकमेच्या एसएमएस मिळेल.
- मोबाईल बँकिंग – तुम्ही तुमचे बँक खाते असलेल्या बँकेचे मोबाईल बँकिंग ॲपच्या द्वारे किंवा यूपीआए ऐप द्वारे बँकेच्या स्टेटमेंट तपासणी कर शकता.
- बँक पासबुक – तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन पासबुक वर एन्ट्री करून घ्या, त्यामुळे तुम्हाला डीबीटी मार्फत जमा झालेले 1500 रुपये ची रक्कम स्पष्ट दिसेल.
- बँक टोल फ्री क्रमांक – बहुतेक बँकेचे टोल फ्री क्रमांक असता, तुम्ही तुमच्या बँकेचे टोल फ्री क्रमांकावर कॉल करून शेवटचे व्यवहार तपासू शकता.
Im a passionate blogger with a degree in Mass Communication and years of experience in writing and digital publishing. I enjoy simplifying complex topics like government schemes, daily updates, and social awareness stories for my readers.