Ladki Bahin Yojana: Don’t Make These 5 Common Mistakes in Application: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वकांशी योजना लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सशक्तिकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना आहे.
ही योजना सुरू करताना राज्य शासनाने महिलांना या योजनेत प्रमुख केंद्रबिंदू ठेवून महिलांच्या सन्मानासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात राज्य शासनाने केली आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व निराधार महिलांना आर्थिक दृष्ट्या सबलीकरण व स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक मनाला 1500 रुपये मानधन दिले जाते.
आता लाडकी बहीण योजनेत अर्ज भरताना काही सामान्य 5 चुका टाळण्याचा आहे, तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना टाळायचा 5 चुका | Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरताना आपल्याला सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.
तसेच या खालील बाबींचा विचार करून अर्ज करायचा आहे. Ladki Bahin Yojana: Don’t Make These 5 Common Mistake
1.आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती तफावत
लाडकी बहीण योजनेत अर्ज भरताना तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि बँक पासबुक वरील माहिती जुळणे आवश्यक आहे. ( नांव, जन्म तारीख)
अर्ज करण्यापूर्वी खात्री करावी कि बँक खात्याशी संलग्न असलेल्या आधार कार्ड आणि बँक पासबुक वरील सर्व माहिती तंतोतंत समान आहे.
जर माहिती जुळत नसेल तर, त्वरित बँकेत जाऊन किंवा आधार सेंटर मध्ये जाऊन दुरुस्त करून घ्या.
2.आधार कार्ड बँक खाते DBT लिंक नसेल
लाडकी बहीण योजनेच्या लाभ थेट आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होतें, यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे, आणि DBT Enabled असणे बंधनकारक आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक व केवायसी करणे गरजेचे आहे.
3.रहिवासी पुराव्यामध्ये त्रुटी
लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे अनिवार्य आहे.
केवळ रेशन कार्ड किंवा मतदार कार्ड देणे पुरेसे नाही, तुम्ही दिलेला रहिवासी दाखला पंधरा वर्ष पूर्वीपासून महाराष्ट्राच्या रहवासी आहात हे सुद्धा करणे असावा. ( १५ वर्षा पूर्वीच राशन कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याच्या दाखला) अर्ज करताना पर्यायी कागदपत्रापैकी योग्य पुरावा जोडा.
4.उत्पन्नाचा चुकीचा दाखला
या योजनेमध्ये कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, उत्पन्नाचा दाखला चुकीचे पद्धतीने सादर करणं ही चुक होऊ शकते.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर अर्ज करणे टाळावे.
जर तुमच्या कडे पिवळा/ केशरी राशन कार्ड असेल तर उत्पन्नचा दाखला सादर करणं आवश्यक नाही.
5.अर्ज करण्याची घाई आणि EKYC अपुरी ठेवणें
लाडकी बहीण योजनेत अर्ज करताना नाव, पत्ता, जन्म तारीख आणि मोबाईल नंबर चुकीचे टाकणं टाळा.
मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
तसेच ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
Im a passionate blogger with a degree in Mass Communication and years of experience in writing and digital publishing. I enjoy simplifying complex topics like government schemes, daily updates, and social awareness stories for my readers.
Ladki bahiniche paise yet asun ladki bahin yadit naav nahi