Ladki Bahin Yojana : ई – केवायसी न होण्याचे हे प्रमुख कारणे आहेत तुमची ई केवायसी झाली का पूर्ण

Ladki Bahin Yojana E-KYC Process :

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू केलेल्या महिला व बाल विकास मंत्री आणि तटकरे यांनी या योजनेमध्ये ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले होते त्यासाठी लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा अवधी दिला होता तो आता 18 नोव्हेंबर पर्यंत आखरी तारीख आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत महिला व बालविकास विभागाकडून प्रयत्न पण केले आहेत ई केवायसी प्रक्रिया तुम्हाला आता 18 तारखेपर्यंत करणे गरजेचे आहे आणि केवायसी प्रक्रिया न होण्याचे काही प्रमुख कारणे आपण खालील पद्धतीने पाहणार आहोत याबद्दल आपण सविस्तरपणे प्रमुख कारणे पाहूयात.Ladki Bahin Yojana E-KYC Process

Mazi Ladki Bahin Yojana 2025 online Apply,

ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न होण्याचे काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे

उत्पन्नाची मर्यादा
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासून जे निकष ठरवला होता की लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे ज्या महिलांनी याचा गैरवापर करून ज्या महिलेचे उत्पन्न जास्त आहे तरी पण या योजनेचा लाभ घेतला असेल तर ही केवायसी प्रक्रियेमध्ये लाभार्थी महिलेला अडथळा निर्माण होणार आहे.

दोन सरकारी योजनेचा लाभ
लाडकी बहीण योजनेमध्ये जर कोणती लाभार्थी महिला राज्यातील दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला कोणत्या पण एकाच योजनेचा लाभ घेता येत असतो त्यामुळे ती महिला या योजनेमध्ये अपात्र ठरेल यामुळे ही केवायसी प्रक्रिया अडथळा निर्माण होतो.

आधार लिंक बँक खात्याशी
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलेचे आधार लिंक हे त्याच्या संलग्न बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे कारण या योजनेची आर्थिक लाभा डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होत असतो जर आधार लिंक बँक खात्याशी नसेल तर प्रक्रिया होणार नाही.

चुकीची कागदपत्रे
लाडकी बहीण योजनेमध्ये चालू असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेमध्ये ज्या ज्या महिलांचे कागदपत्रे हे चुकीचे असून त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे लाभार्थी ह्या योजनेतून वगळल्या जाऊ शकतात.

वयाची मर्यादा
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला ज्या निकष ठरवला होता त्यामध्ये महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक होते परंतु च्या महिलेने एकवीस वर्षाच्या अगोदर किंवा 65 वर्षानंतर असलेल्या महिलांनी जर या योजनेमध्ये लाभ घेतला असेल तर त्या महिलेची केवायसी होणे अशक्य आहे.

आयकर भरणे
लाडकी बहिण योजनेमध्ये जर लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य आयकर जाता असेल तर त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा निकष ठरवला होता त्यामध्ये जी महिला या योजनेचा गैरवापर करून लाभ घेत असेल तर त्या महिलेला अपात्र ठरविण्यात येते.

चार चाकी वाहन
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलेच्या कुटुंबामध्ये जर कुणाच्या पण नावे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळता तर त्या महिलेला योजनेतून अपात्र करण्यात येते कारण की परिवहन विभागाकडून महिला विभागाकडे लाभार्थी महिलांची पूर्ण यादी पाठवली आहे त्या मधुची महिला अपात्र होईल त्या महिलेला या योजनेतून वगळण्यात येते.

ladki bahin yojana ekyc kashi karychi

ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे का आवश्यक आहे

लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे हे या योजनेमध्ये लाभार्थी महिलांचे गैरप्रकार दिसून आले होते त्यामध्ये लाखो महिलांनी या योजनेचा अपात्र असून सुद्धा फायदा घेतला त्यामुळे या योजनेमध्ये पारदर्शकता पणा येण्यासाठी आणि अपात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ नये यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थ्याच्या मासिक हप्ता 1500 रुपये हा थांबवला जाऊ शकतो ज्या महिलांची प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे त्या महिलांना डीबीटीच्या माध्यमातून सुरळीतपणे प्रत्येक हप्ता येण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment