Ladki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे एकदम सोपी पद्धत बघा

Ladki Bahin Yojana Payment Status Check :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना 2024 पासून महाराष्ट्र राज्य मध्ये महिलांसाठी सुरू केली क्रांतिकारी योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थी मिळालेला प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो हा लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केला जातो.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 15 हप्त्याचे वितरण हे पूर्ण पणे झालेले आहे नुकता 16 व्या हप्त्याचे वितरण हे कालपासून पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 16 व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नाही त्यांना त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झाले का नाही याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती बघूया.(Ladki Bahin Yojana Payment Status Check )

Mazi Ladki Bahin Yojana 2025 online Apply,

लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस कसं पाहायचं

लाडकी बहीण योजनेमध्ये 16 हप्ता चे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही हे कसे चेक करायचे ते आपण खालील पद्धतीने सर पाहूया.

अधिकृत वेबसाईटवर जायचा
सर्वात प्रथम पी एफ एम एस या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पेमेंट स्टेटस चेक करू शकता.
पेमेंट स्टेटस जाणून घ्या
त्यानंतर तुम्हाला या संकेतस्थळावरती पेमेंट स्टेटस जाणून घ्या असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
बँकेचे नाव
आता तुम्हाला तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा क्रमांक व बँकेचे नाव तिथे टाका. आपले बँक खाते क्रमांक व्यवस्थितपणे न चुकता तिथे टाका.
कपच्या कोड आणि ओटीपी
आता आपले बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर तिथे तुम्हाला कपच्या कोड दिसेल तिथे सर्च करा आणि ओटीपी या बटणावर क्लिक करा.
ओटीपी
आता तुमच्या आधार लिंक असलेल्या किंवा नोंदणी मोबाईल नंबर वरती ओटीपी आला असेल तो तिथे दर्ज करा.
पेमेंट स्टेटस बघा
आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेतील हप्त्याचे पेमेंट स्टेटस तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

WhatsApp Image 2025 11 06 at 2.54.27 PM

हप्त्याचे पेमेंट स्टेटस ऑफलाइन कसे बघायचे

जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे पेमेंट स्टेटस ऑफलाइन पाहायचे असेल तर तुम्हाला खाली ल पद्धतीने पहावे लागेल.
बँक सेवा
तुम्हाला जर चालू हप्त्याचे पेमेंट स्टेटस पाहायचे असेल तर तुमची जी बँक लिंक आहे त्या बँकेच्या टोल फ्री क्रमांक वरती कॉल करून विचारपूस करू शकता.
बँकेत जा
तुमचे तुमच्या अर्जासोबत जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही स्टेटमेंट काढून आपले स्टेटस चेक करू शकता.
मोबाईल बँक
जर तुमच्याकडे तुमच्या बँकेचे मोबाईल बँकिंग ॲप असेल तर त्यामध्ये पण तुम्ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करून तुमचे स्टेटस चेक करू शकता.

Aadhar Bank Linking Status check online

Leave a Comment