Mukhyamantri Ladki Bahin Yojana eKYC
Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना, या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन दिले जाते.ladki bahin yojana ekyc kashi karychi
लाडक्या बहिणी योग्य संबंधात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेत आता सर्व पात्र लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे यासाठी शेवटची तारीख घोषणा केली आहे, तर बघूया याबद्दल सविस्तर माहिती.
लाडकी बहीण योजनेत eKYC कशी करायची | Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC

लाडकी बहीण योजनेत सहभागी लाभार्थी महिलांना योग्य वेळी हफ्ता मिळावा तसेच निकषानुसार योग्य महिलांना लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाने सर्व महिलांच्या ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
यासाठी संबंधित विभागाने अद्यावत पोर्टल तयार केले आहे, त्यानुसार सर्व महिलांना यांवर आधार ओटीपी टाकून ई केवायसी प्रक्रिया करायची आहे.Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC Step by Step Process
तर बघूया ई केवायसी प्रक्रिया कशा प्रकारे करायचं आहे. e-KYCची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या — https://ladakibahin.maharashtra.gov.in
- मुखपृष्ठावरील “e-KYC” बॅनर किंवा लिंक क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार क्रमांक व CAPTCHA कोड भरा.
- Send OTP वर क्लिक करा → आपल्या आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP भरा → Submit करा.
- पुढे पती/वडिलांचा आधार क्रमांक व त्यांच्या आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP भरा.
- जात प्रवर्ग निवडा, आवश्यक घोषणांचे टिक मार्क करा आणि Submit करा.
- यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
केवायसी करण्याची अंतिम तारीख जाहीर | Ladki Bahin Yojana eKYC Last Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी कारणे बंधनकारक आहे.
दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी केवायसी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने नवीन पोर्टल तयार केलेले आहे, त्या पोर्टलच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत करायचे आहे.
Im a passionate blogger with a degree in Mass Communication and years of experience in writing and digital publishing. I enjoy simplifying complex topics like government schemes, daily updates, and social awareness stories for my readers.