Ladka Bhau Yojana :लाडका भाऊ योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती?

Ladka Bhau Yojana Online Apply Form And Document :

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू असलेल्या लाडकी बहीण योजने प्रमाणेच आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये राज्यातील तरुण तरुण तरुणीसाठी एक महत्त्वाची ही योजना शासनाने लागू केलेली आहे. राज्यातील तरुण मुलांसाठी योजना ची सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचे कौशल्य पाहिले जाईल आणि त्यांना कार्यशाळेतून प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मविश्वास वाढवणे व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे.
आता आपण सविस्तर माहिती घेऊया मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे कोणती याबद्दल आपण माहिती घेऊया.

152318085

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 चा अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नवी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेमध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच बारावी उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण पदवीधर अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्टाय फंड दात आठ ते दहा हजार रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहेत.
माझा लाडका भाऊ योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्य प्रशिक्षण योजने करता शासनाला 5550 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे केंद्र सरकारकडून हे निधी राज्य सरकारला प्राप्त पण झाला आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये जे तरुण काम करतील त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना असा लाभ देण्यात येणार आहे.

WhatsApp Image 2025 10 19 at 5.13.11 PM

लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

  • सर्वप्रथम बारावी आयटीआय पदवीधर पदवीधर उमेदवार व रोजगार इच्छुक तरुण या योजनेसाठी पात्र आहेत.
  • त्यानंतर rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला नोंदणी करायची आहे.
  • त्यानंतर विविध औद्योगिक क्षेत्रातील मोठे प्रकल्प मोठे उद्योग कंपन्या इत्यादी यांना आवश्यक असलेले कौशल्य मनुष्यबळाची मागणी या वेबसाईटवर पाठवण्यात येईल ते माहिती आपल्याला वाचून त्यामध्ये आपण बसतो का हे पाहायचे.
  • लाडका भाऊ योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण संधी प्रत्येक आर्थिक वर्षात योजनेमार्फत उपलब्ध करून देण्याच्या आश्वासन राज्य सरकारने घेतले आहे.
  • हा प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असेल या कालावधीमध्ये उमेदवार शासन मार्फत अधिकृत विद्यावेतन देण्यात येईल.
  • हे विद्या वेतन लाभार्थी उमेदवाराच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट जमा होणार आहे.
cm5

लाडक्या भाऊ योजनेसाठी पात्रता

  • या योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची उमेदवाराची पात्रता बारावी पास पासून पदव्युत्तर पर्यंत कोणती पण चालते.
  • या योजनेमध्ये बारावी पास उमेदवाराला ₹6,000 आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवाराला 8000 रुपये व पदवीधर उमेदवाराला 10000 रुपये असे शासनाकडून विद्या वेतन मिळेल.
  • या योजनेसाठी उमेदवार बेरोजगार उमेदवारास पात्र असे असेल.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधार कार्डशी डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे.
  • इच्छुक उमेदवाराला रोजगार महास्वयम या संकेतस्थळावरती नोंदणी करणे आवश्यक आहे.
fadanvis t

लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

पॅन कार्ड

आधार कार्ड

सर्व सर्टिफिकेट

पासपोर्ट साईज फोटो

Leave a Comment